Municipal Elections 2026: "बाप बडा न भैया, सब से बडा रुपैया!" अंबादास दानवेंचे सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:56 IST2026-01-16T19:51:48+5:302026-01-16T19:56:31+5:30
Ambadas Danve On Municipal Elections Result: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीने आणि विशेषतः भाजपने मिळवलेल्या यशावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. भाजपचा हा विजय विकासाचा नसून केवळ 'रुपयाची कमाल' असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Municipal Elections 2026: "बाप बडा न भैया, सब से बडा रुपैया!" अंबादास दानवेंचे सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या मोठ्या यशावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अत्यंत तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. "बाप बडा न भैया, सब से बडा रुपैया" अशी हिंदीतील म्हण वापरत दानवे यांनी भाजपच्या विजयाला धनशक्तीचा विजय असल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीत भाजपने आणि महायुतीने विकासाचा दावा केला असला तरी, अंबादास दानवे यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निकालांनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "महाराष्ट्र महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत, पण हे यश रुपयाच्या जोरावर आले आहे. रुपया खूप मोठी कमाल करतो आणि या निवडणुकीत भाजपने सत्ता आणि संपत्तीचा वारेमाप वापर केला आहे. त्यामुळेच त्यांच्या जागा निवडून आल्या आहेत." अंबादास दानवे पुढे म्हणाले की, "जनतेचे अनेक प्रश्न आहेत, जे स्वतः भाजपनेच उपस्थित केले. सत्ता हाती आल्यावर भाजपने हे प्रश्न कसे मार्गी लावायचे, यासाठी त्यांनी कोणताही ठोस सल्ला दिला नाही. केवळ संपत्तीच्या बळावर निवडणुका जिंकल्या आहेत."
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Ambadas Danve says, “...The BJP has used its power and resources on a large scale to secure this victory..." pic.twitter.com/06ByRh0Fvk
— IANS (@ians_india) January 16, 2026