"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:00 IST2026-01-09T17:58:58+5:302026-01-09T18:00:37+5:30
आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, ओवेसी म्हणाले...

"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी?
आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे विधान भाजप आमदार तथा मंत्री नितेश राणे यांनी केले होते. यासंदर्भात आता एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी थेट पाकिस्तानच्या संविधानाचाच संदर्भ देत प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये प्रत्रकारांसोबत बोलत होते.
आय लव्ह महादेव म्हणणारी व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे, असे विचारले असता, ओवेसी म्हणाले, "पाकिस्तानच्या संविधानात लिहिले आहे की, केवळ एका समाजाची व्यक्तीच राष्ट्रपती आणि पंतप्रधान होऊ शकते. आपल्या संविधानात अशाप्रकारचे काहीही लिहिलेले नाही. संविधानानुसार, या देशाचा कुठलाही धर्म नाही. हा देश सर्व धर्माला मानतो आणि जे इश्वर मानत नाहीत, त्यांनाही मानतो, असे संविधान सांगते. आता हे लोक दाखवायला काहीच नसल्याने अशा प्रकारे बोलत आहेत."
"मी असदुद्दीन ओवेसी पक्षाचा अध्यक्ष आहे, हे पक्षाचे अधिकृत मत..." -
यावर, मग वारीस पठाण असे का म्हणत आहेत की, बुरखा घालणारी...? असे विचारले असता ओवेसी म्हणाले, "ओवेसी म्हणाले, वारीस पठाण हे आमच्या पक्षाचे माजी आमदार आहेत आणि मी असदुद्दीन ओवेसी पक्षाचा अध्यक्ष आहे. हे पक्षाचे अधिकृत मत आहे, की कुणीही होऊ शकते. ज्याच्याकडे बहुमत असेल, तो पक्ष निर्णय घेईल."
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, "त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. तो भ्याड हल्ला होता. ज्या लोकांनी हल्ला केला, त्यांच्या पाठीशी मोठ-मोठे लोक आहेत. मोठी शक्ती आहे." एवढेच नाही तर, "त्या वार्डातील जनता आणि औरंगाबादची जनता, बोलून अथवा हिंसाचार करून व्हे तर, १५ ऑगस्टच्या दिवशी, पतंगच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्या भ्याड ताकदीचा पराभव करतील," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.