Kandivali Firing: आर्थिक वादातून रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार; बार मॅनेजरला अटक, मुख्य आरोपींचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 09:57 IST2025-11-22T09:57:06+5:302025-11-22T09:57:06+5:30
Kandivali shooting case: कांदिवली (पश्चिम) येथे फ्रेडी डी’लिमा (४२) या रिअल इस्टेट एजंटवर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला

Kandivali Firing: आर्थिक वादातून रिअल इस्टेट एजंटवर गोळीबार; बार मॅनेजरला अटक, मुख्य आरोपींचा शोध सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: कांदिवली (पश्चिम) येथे फ्रेडी डी’लिमा (४२) या रिअल इस्टेट एजंटवर तिघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. मुंबई पोलिसांनी गुरुवारी एकाला अटक केली. त्याचे नाव मुन्ना मय्युद्दीन शेख उर्फ गुड्डू (३५) असून, तो एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो.
गोळीबार करणारे अजूनही फरार असून, गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या अनेक पथकांकडून त्यांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान केलेल्या चौकशीनुसार शेखने आर्थिक वादामुळे डी’लिमा यांना ठार करण्याचा कट रचला होता, असा संशय आहे. डी’लिमाचे अनेक व्यक्तींशी वैर आहे. आरोपी शेखला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मास्क घालून आले आरोपी
डी’लिमा यांच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार झाला होता. तीन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये एक गोळी त्यांच्या पोटात, तर दुसरी छातीत लागली. पोलिसांनी सांगितले, ओळख लपवण्यासाठी तिघांनीही चेहऱ्यावर मास्क लावले होते.