लातूर महानगरपालिका: स्वीकृत सदस्यत्वावरून भाजपमध्ये राडा; उमेदवारी कापल्याने आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 20:05 IST2026-03-10T20:05:40+5:302026-03-10T20:05:57+5:30

लातुरात भाजपमध्ये 'हायव्होल्टेज ड्रामा'; ऐनवेळी नाव बदलल्याने इच्छुक उमेदवार संतप्त, अंगावर ओतून घेतले ज्वलनशील पदार्थ

Latur Municipal Corporation: Latur BJP Crisis: Aspiring Nominee Sanjay Gir Attempts Self-Immolation After Last-Minute Cancellation of Candidacy | लातूर महानगरपालिका: स्वीकृत सदस्यत्वावरून भाजपमध्ये राडा; उमेदवारी कापल्याने आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर महानगरपालिका: स्वीकृत सदस्यत्वावरून भाजपमध्ये राडा; उमेदवारी कापल्याने आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर : लातूर शहर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपात नाट्यमय घडामोडी घडल्या. रविवारी रात्री भाजपाच्या प्रदेश कार्यालयाकडून स्वीकृतच्या दोन जागांसाठी भीमाशंकर बेंबळकर व संजय गीर यांची नावे निश्चित करून शहर जिल्हाध्यक्षांकडे पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, साेमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला संजय गीर यांच्याऐवजी ॲड. प्रदीप मोरे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या संजय गीर यांनी सोमवारी दुपारी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना लातूर शहरात घडली.

भाजपाच्या प्रदेश कार्यालयाकडून स्वीकृतसाठी नावे जाहीर करण्यात आल्यानंतर ऐनवेळी संधी हुकल्याने संजय गीर हे प्रचंड नाराज झाले. त्यांनी आता काय करायचे... असे म्हणत हातात असलेल्या ज्वलनशील पदार्थाच्या डबा अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत घालत त्यांना धीर दिला. तसेच त्यांच्या घराकडे घेऊन गेले. यासंदर्भात शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Web Title : लातूर भाजपा में कलह: नामांकन रद्द होने पर आत्मदाह का प्रयास।

Web Summary : लातूर नगर निगम में नामांकन से वंचित होने पर संजय गिर ने आत्मदाह का प्रयास किया। भाजपा की शुरुआती सूची में बदलाव हुआ, गिर को प्रदीप मोरे से बदल दिया गया, जिससे विरोध प्रदर्शन हुआ। पार्टी अधिकारियों की प्रतिक्रिया आनी बाकी है।

Web Title : Latur BJP infighting: Nomination denial leads to self-immolation attempt.

Web Summary : Upset over being denied a Latur municipal nomination at the last minute, Sanjay Gir attempted self-immolation. BJP's initial list was changed, replacing Gir with Pradeep More, sparking the protest. Party officials are yet to comment.