काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय

By संदीप शिंदे | Published: June 4, 2024 09:26 PM2024-06-04T21:26:16+5:302024-06-04T21:26:53+5:30

Latur Lok Sabha Result 2024: भाजपाच्या विजयाची हॅट्‌ट्रिक हुकली

Latur Lok Sabha Result 2024: Congress wins in Latur again! Splendid victory of Shivaji Kalge | काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय

काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय

Latur Lok Sabha Result 2024: जवळपास पावणेतीन लाखांहून अधिक मताधिक्याने ताब्यात असलेली लातूरची जागा भाजपाला गमवावी लागली. काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत पुन्हा एकदा आपला गड काबिज केला. 

भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या विरूद्ध डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने आव्हान उभे केले होते. मागील १२ निवडणुकांमध्ये आठवेळा काँग्रेस, तीनदा भाजपा तर एकदा शेकापने लढाई जिंकली होती. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर लातूर लोकसभेची जागा राखीव झाली. तिथे २००९ मध्ये जेमतेम ८ हजार मतांनी काँग्रेस निवडून आली. मात्र त्यानंतरच्या दोन्ही निवडणुका भाजपाने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या होत्या. त्याला आव्हान देत पावणेतीन लाखांचे मताधिक्य बाजूला सारत  काँग्रेसने पुन्हा झेंडा फडकविला असून, अंतिम फेरीत ६१,८८१ इतके मताधिक्य होते.

Web Title: Latur Lok Sabha Result 2024: Congress wins in Latur again! Splendid victory of Shivaji Kalge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.