माजी मुख्यमंत्री ९१व्या वर्षी कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 05:18 IST2020-08-03T05:18:07+5:302020-08-03T05:18:54+5:30

पुणे येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. ९१ वर्षे वय, मधुमेह आणि कोरोनाची लागण झाल्याने सर्वांना चिंता होती

Former Chief Minister released from coronation at 91 years | माजी मुख्यमंत्री ९१व्या वर्षी कोरोनामुक्त

माजी मुख्यमंत्री ९१व्या वर्षी कोरोनामुक्त

निलंगा (जि. लातूर) : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांची १७ दिवसांनंतर करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

पुणे येथील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. ९१ वर्षे वय, मधुमेह आणि कोरोनाची लागण झाल्याने सर्वांना चिंता होती. खुद्द डॉ. निलंगेकर यांनी आपल्याला काही होणार नाही. आयुष्यभर लोकांच्या कामात राहिलो आहोत, असे सांगितले होते.

Web Title: Former Chief Minister released from coronation at 91 years