Who is the winner of the 10 constituencies in Kolhapur district? | Maharashtra Assembly Election 2019: भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसचा दणका
Maharashtra Assembly Election 2019: भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसचा दणका

ठळक मुद्देइचलकरंजीमधून प्रकाश आवाडे ३३ हजार २४६ अशा निर्णायक मतांनी पुढे आहेत.

कोल्हापूर : भाजपमुक्त कोल्हापूर; दोन्ही काँग्रेसला चांगले यश - शिवसेनेचा सुपडासाप


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या कोल्हापूर जिल्हयात त्यांच्याच पक्षाचा विधानसभा निवडणुकीत सुपडासाप झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर भाजपचा मोठ्या मताधिक्यांनी दारूण पराभव झाला. त्यामुळे कोल्हापूर आता भाजपमुक्त झाले आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायला निघालेल्या प्रदेशाध्यक्षांना स्वत:च्या जिल्ह्यातही भाजपला यश मिळवून देता आले नाही. या उलट दोन्ही काँग्रेसची किमान ५ जागांवर विजयी घोडदोड सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही खासदार शिवसेनेचे विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत लोकांनी शिवसेनेलाही धोबीपछाड दिला असून लढलेल्या आठ पैकी त्यांचा एकच उमेदवार आता आघाडीवर आहे.

 

ताज्या माहितीनुसार कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचे उमेदवार चंद्रकात जाधव हे विजयी हे विजयी झाले आहेत.  त्यांनी १५ हजार ९०० मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमध्ये जाधव यांच्या रुपाने काँग्रेसने तब्बल दहा वर्षांनी या जागेवर आपला हक्क दाखविला आहे. कोल्हापूर शहरातील शिवसेनेची हॅट्रीक न होण्याचा इतिहासही कायम राहिला आहे.

चंदगड मतदारसंघात वंचितचे अप्पी पाटील यांनी बाजी मारली आहे. पहिल्या फेरीपासूनच ते पुढे आहेत. राज्यात जिथे वंचितचे उमेदवार मागे आहेत. तिथे कोल्हापूर मधील चंदगड मतदारसंघ अपवाद ठरला आहे. अप्पी पाटील हे ८ हजार ६०९ मतांनी पुढे आहेत. लक्षवेधी लढतीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे चंद्रकात जाधव हे १४ हजार मतांनी आघाडीवर दक्षिण मधून ऋतुराज पाटील हे पहिल्यापासूनच विजयाच्या मार्गावर आहेत. इचलकरंजीमधून प्रकाश आवाडे ३३ हजार २४६ अशा निर्णायक मतांनी पुढे आहेत.

 

 

कागलमध्ये धाकधुक-- दोघांचाही विजयाचा दावा... जल्लोष सुरु...

विद्यमान आमदार हसन मुश्रीफ व भाजपचे बंडखोर समरजीत यांच्यात काट्याची टक्कर सुरु आहे. १८ व्या फेरीअखेर मुश्रीफ यांनी १६ हजार ३८० मतांची निर्णायक आघाडी घेतली असली तरी दोन्ही बाजूनी विजयाचा दावा करीत मतदान केंद्रासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. यामुळे येथे संभ्रमावस्था असून येथे अजूनही ८ उ फेऱ्या बाकी आहेत. यामध्ये गडहिंग्लज उत्तुरमधील ६२ हजार मतांचा समावेश आहे. या मतांवरच यांचा जय पराजय ठरलेला असून उमेदवार व कार्यकत्यांना मध्ये धाकधुक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा हायव्होलटेच मतदारसंघ असल्याने संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागून आहे.

करवीरमधून काँग्रेसचे पी. एन. पाटील हे ३ हजार मतांनी पुढे तर कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे १३ हजार ९१० मतांनी आघाडीवर आहेत. हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजूबाबा आवळे हे १५८३ मतांनी आघाडीवर आहेत. शिरोळमधून अपक्ष राजेंद्र पाटील हे १९ हजार २४९ मतांची आघाडी घेत विजयाच्या वाटेवर आहेत. राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर ५ हजार ८०० मतांनी आघाडीवर आहेत. शाहूवाडीमध्ये शिवसेनेचे सत्यजीत पाटील हे ७ हजार ५९६ मतांनी पुढे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदार संघ

कोल्हापूर उत्तर         

कोल्हापूर दक्षिण       

करवीर               

कागल         

राधानगरी             

चंदगड

शाहूवाडी 

हातकणंगले     

इचलकरंजी         

शिरोळ

  

 

 

 

 

Web Title: Who is the winner of the 10 constituencies in Kolhapur district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.