Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ८ ठिकाणी बदलली मतदान यंत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:53 IST2024-11-21T15:52:02+5:302024-11-21T15:53:04+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत बुधवारी जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे बदलण्यात आली. प्रत्यक्ष मतदान सुरू झाले तेव्हापासून १० ...

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात ८ ठिकाणी बदलली मतदान यंत्रे
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत बुधवारी जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे बदलण्यात आली. प्रत्यक्ष मतदान सुरू झाले तेव्हापासून १० बॅलेट युनिट, ८ कंट्रोल युनिट व २१ व्हीव्हीपॅट मशिन बदलली गेली. मतदान सुरू होण्यापूर्वी केल्या गेलेल्या मॉकपोलवेळी १९ बॅलेट युनिट, २३ कंट्रोल युनिट, २९ व्हीव्हीपॅट मशिन बदलले गेले.
विधानसभेसाठी बुधवारी जिल्ह्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गेले महिनाभर जय्यत तयारी करण्यात आली होती. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिनची तपासणी करून ते सीलबंद केले होते. मात्र तरीही मतदानादिवशी काही यंत्रांमध्ये बिघाड होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढीव यंत्रे तयार ठेवली जातात. जिथे जिथे तक्रारी झाल्या तिथे मतदान यंत्रे बदलण्यात आली. त्यांपैकी ८ केंद्रांवरील सेटच बदलले गेले.
या झाल्या तक्रारी
मतदान यंत्रांबाबत बटण दाबल्यावर लाइट दिसत नाही, बीप वाजत नाही. मतदान केल्यानंतर ते दिसण्यासाठी बराच वेळ लागत आहे. व्हीव्ही पॅट मशिनमध्ये प्रिंट दिसत नाही, अशा तक्रारी झाल्या होत्या.