कोल्हापूर : इचलकरंजीत तडीपार टोळीच्या प्रमुखाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 16:14 IST2021-11-16T16:14:15+5:302021-11-16T16:14:56+5:30

इचलकरंजी : येथील विकली मार्केटसमोर एका तडीपार टोळीच्या प्रमुखाला पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. अक्षय राजेंद्र नेमिष्टे (रा. शेळके ...

Tadipar gang leader arrested in Ichalkaranji | कोल्हापूर : इचलकरंजीत तडीपार टोळीच्या प्रमुखाला अटक

कोल्हापूर : इचलकरंजीत तडीपार टोळीच्या प्रमुखाला अटक

इचलकरंजी : येथील विकली मार्केटसमोर एका तडीपार टोळीच्या प्रमुखाला पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. अक्षय राजेंद्र नेमिष्टे (रा. शेळके गल्ली) असे त्याचे नाव आहे.

नेमिष्टे गॅँगचा म्होरक्या असलेल्या अक्षय याच्यासह त्याच्या सहा जणांच्या टोळीला ७ सप्टेंबर २०२१ पासून तीन महिन्यांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तरीही नेमिष्टे हा शहरात फिरताना आढळला. विकली मार्केटसमोरील एका वाईन शॉपजवळ उपअधीक्षकांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गर्दी, मारामारी, शिवीगाळ, धमकी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

Web Title: Tadipar gang leader arrested in Ichalkaranji