कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:44 IST2025-07-24T15:42:25+5:302025-07-24T15:44:25+5:30

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले

Recounting of votes in Kolhapur North and Chandgad constituencies, heavy police deployment for security | कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी २ हजार ४२४ मतदान केले आणि ते तंतोतंत जुळले. कोल्हापुरातील राजाराम तलाव येथील गोदामात सुरू असलेल्या मतदान फेरपडताळणीत हे मतदान झाले आहे. बुधवारपासून पुढे तीन दिवस चंदगडसहकोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनवर ही प्रक्रिया चालणार आहे.

विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर विरोधी पक्षातील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांच्या फेरपडताळणीची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून मॉकपाेल प्रक्रियेला सुरुवात झाली. राजाराम तलावाशेजारच्या शासकीय गोदामात एकाच हॉलमध्ये मतदान प्रक्रिया झाली.

यावेळी प्रतिनिधी दहा ते बारा आणि कर्मचारी मात्र शंभर उपस्थित होते. आमदार शिवाजी पाटील यांच्यातर्फे प्रतिनिधी म्हणून भारती जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर-कुपेकर यांच्यावतीने दिलीप पाटील तसेच अपक्ष उमेदवार संतोष चौगुले यांच्यावतीने मानसिंग देसाई हे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळी साडेआठ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेले ईव्हीएम स्ट्राँगरूम उघडण्यात आले. उमेदवारांच्या मागणीप्रमाणे त्यांना विधानसभेला झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी दाखवण्यात आली. त्यानंतर हा डेटा काढून टाकून त्याच इव्हीएमवर प्रतिनिधींकडून नव्याने मतदान करून घेतले गेले. त्यानंतर मॉकपोलची मतमोजणी व व्हीव्हीपॅट मशिन्समधील मतदान चिठ्ठीची तपासणी करण्यात आली. झालेले मतदान आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची आकडेवारी तंतोतंत जुळली. 

यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शक्ती कदम यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी उपस्थित होते.

प्रचंड बंदोबस्तात प्रक्रिया

ही प्रक्रिया इन कॅमेरा करण्यात आली. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात होता. उमेदवारांचे प्रतिनिधी व मोजके कर्मचारी वगळता कोणालाही आत सोडले नाही. ही प्रक्रिया आज गुरुवार, शुक्रवार व शनिवारीदेखील सुरू राहणार आहे. यात कोल्हापूर उत्तरचा समावेश आहे.

केंद्र क्रमांक : झालेले मतदान

  • केंद्र क्रमांक ३ कोवाडे : ७०७
  • केंद्र क्रमांक ५ निंगुडगे : ९०५
  • केंद्र क्रमांक १०० खणदाळ : ८१२


१४०० मतांच्या आधीच थांबले..

वरील तीन केंद्रांवरील प्रत्येक मशीनवर १४०० मतं घेण्यात येत आहेत. हा अधिकार फक्त उमेदवाराला, किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला किंवा अभियंत्याला होता. त्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधी दिवसभर मतदान यंत्रांवर मतदान करत बसले होते. मात्र १४०० मते पूर्ण होण्याआधीच ते थांबले. त्यानंतर मतदानाची पडताळणी केली गेली.

Web Title: Recounting of votes in Kolhapur North and Chandgad constituencies, heavy police deployment for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.