Kolhapur Election: शिवाजी पेठेतील जनता धनशक्तीवाल्यांना गारद करील : राजेश क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:14 IST2019-04-18T17:14:12+5:302019-04-18T17:14:58+5:30
शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेने गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद करण्यासाठी कंबर कसली आहे

Kolhapur Election: शिवाजी पेठेतील जनता धनशक्तीवाल्यांना गारद करील : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील स्वाभिमानी जनतेने गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या धनशक्तीस गारद करण्यासाठी कंबर कसली आहे. तसेच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढ्यात शिवाजी पेठ शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या बाजूने असल्याने विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असा टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे लगावला.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठ परिसरात आयोजित प्रचारफेरी प्रसंगी ते बोलत होते.सकाळी प्रचारफेरीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करीत ही प्रचारफेरी पुढे उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, गांधी मैदान, फिरंगाई मंदिर, आठ नंबर शाळा, जुना वाशी नाका, खंडोबा तालीममार्गे झुंजार क्लब येथे येऊन समाप्त करण्यात आली.
प्रचारफेरीत माजी महापौर विलासराव सासने, अशोकराव जाधव, माजी नगरसेविका भारती पोवार, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मंगलताई साळोखे, दीपक गौड, तुकाराम साळोखे, रणजित जाधव, धनाजी दळवी, अमित चव्हाण, सुनील भोसले, नीलेश गायकवाड, भाई जाधव, सुनील टिपुगडे, योगेश चौगुले, पीयूष चव्हाण, विश्वदीप साळोखे, प्रशांत जगदाळे, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, रूपेश इंगवले, राहुल इंगवले, पिंटू साळोखे, विनय दळवी, हृषिकेश इंगवले, सुकुमार लाड, मयूर गवळी, आदी सहभागी झाले होते.
जुना बुधवार पेठ परिसरात आज प्रचारफेरी
प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता जुना बुधवार पेठ परिसरात प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. प्रचारफेरीची सुरुवात तोरस्कर चौक येथून करण्यात येणार आहे. ही फेरी पुढे जुना बुधवार तालीम, शहीद भगतसिंग चौक, मृत्युंजय तरुण मंडळ, बुरुड गल्ली कॉर्नर, जोशी गल्ली चौक, बजाप माजगावकर तालीम, पापाची तिकटी मेन रोड, कोल्हापूर महानगरपालिका- काळा इमाम तालीम- सम्राट चौकमार्गे शिवसेना शहर कार्यालय येथे समाप्त होणार आहे.
कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गुरुवारी शिवाजी पेठेतून प्रचारफेरी काढण्यात आली. यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक, सुरेश साळोखे, रविकिरण इंगवले, आदी सहभागी झाले होते.