मोपेडवरून घसरून टेम्पोच्या चाकात सापडल्याने एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:22 IST2020-06-11T12:21:42+5:302020-06-11T12:22:44+5:30
कोरोची (ता हातकणंगले) येथे मोपेडवरून घसरून आयशर टेम्पोच्या मागील चाकात सापडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.

मोपेडवरून घसरून टेम्पोच्या चाकात सापडल्याने एकाचा जागीच मृत्यू
ठळक मुद्देमोपेडवरून घसरून टेम्पोच्या चाकात सापडल्याने एकाचा जागीच मृत्यूगाडी आणि चालका शहापूर पोलिसांच्या ताब्यात
इचलकरंजी : कोरोची (ता हातकणंगले) येथे मोपेडवरून घसरून आयशर टेम्पोच्या मागील चाकात सापडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.
सुरेश यशवंत येसने (वय ५९, रा. सर्वोदयनगर, कबनुर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सकाळी १० च्या सुमारास घडली. ते पंचायत समिती बांधकाम विभागात शिपाई म्हणून काम करत होते. याप्रकरणी आयशर (एम एच १२- पीक्यू ०६१८) गाडी आणि चालकाला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळी बघ्याची मोठी गर्दी जमली होती. त्याच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. येसने हे पुढील वर्षी मे महिन्यात कामावरून रिटायर्ड होणार होते.