VidhanSabha Election 2024: इचलकरंजीत तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:08 IST2024-10-21T13:06:49+5:302024-10-21T13:08:32+5:30
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमधील उमेदवारासमोर तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी महायुतीमधील दोन ...

VidhanSabha Election 2024: इचलकरंजीत तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली
इचलकरंजी : इचलकरंजीविधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमधील उमेदवारासमोर तिसरा पर्याय देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यासाठी महायुतीमधील दोन नेते व भाजपमधून बंडखोरी करणारा एक नेता या तिघांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठका सुरू आहेत. याचे नियोजन करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.
महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. भाजपकडून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तिसरा पर्याय दिला जाणार की महायुतीमधील बंड थंड केले जाणार यावर बरेचशे अवलंबून आहे.
महाविकास आघाडीकडून इचलकरंजीची जागा कुणाच्या वाट्याला जाणार त्यावर थोडे लक्ष असून, महायुतीमधील भाजप वगळता अन्य दोन सहभागी पक्षातील दोन प्रमुख बंडखोरी करून उमेदवारी दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवक तसेच काही प्रमुखांशी त्यांचा रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. बंडखोरीतून तिसरा पर्याय उभा राहणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.