Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार, समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:36 AM2024-11-23T07:36:23+5:302024-11-23T07:37:08+5:30
निवडणुकीला राज्य पातळीवरील प्रश्नांबरोबरच स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा रोक राहिला. व्यक्तिगत उणे-धुणेही काढल्याने निवडणुकीत ईर्षा टोकाला पोहोचली होती.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत आता विजयी कोण होणार? याबद्दल पैजा लावल्या जात आहेत. पैजांच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. या पैजा नुसत्या आव्हान देण्यापर्यंत न थांबता प्रतिज्ञापत्र करून देण्यापर्यंत समर्थकांची मजल गेली आहे.
यावेळच्या निवडणुकीला राज्य पातळीवरील प्रश्नांबरोबरच स्थानिक प्रश्नांवर प्रचाराचा रोक राहिला. व्यक्तिगत उणे-धुणेही काढल्याने निवडणुकीत ईर्षा टोकाला पोहोचली होती. त्यातून एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देण्यात आले. मतदानानंतर राजकीय हवा थाेडी थंड होईल, असे वाटत होते; पण निकालाच्या पार्श्वभूमीवर विजय कोणाचा? यावरून पैजांच्या माध्यमातून आव्हान-प्रतिआव्हान दिले जात आहे. एक लाखापासून २५ लाखांपर्यंत पैजा लावण्यात आल्या आहेत, तर एकाने चक्क ३० लाखांची कार देण्याची पैजही लावली आहे.
पैजा कशाच्या ?
दहा गुंठे जमीन
दोन गुंठ्यांचा प्लॉट
२५ लाखांपर्यंतचे पैसे
मिशी, डोक्यावरील केस काढणे