Vidhan Sabha Election 2024: प्रियांका गांधी यांची १६ नोव्हेंबरला कोल्हापुरात सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 15:49 IST2024-11-09T15:48:39+5:302024-11-09T15:49:34+5:30
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची १६ नोव्हेंबरला कोल्हापुरातील गांधी मैदानात सभा ...

Vidhan Sabha Election 2024: प्रियांका गांधी यांची १६ नोव्हेंबरला कोल्हापुरात सभा
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची १६ नोव्हेंबरला कोल्हापुरातील गांधी मैदानात सभा आयोजित करण्यात आली आहे. प्रियांका गांधी या पहिल्यांदाच कोल्हापुरात येणार आहेत.
जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व ठिकाणी दहा उमेदवार उभे असून, यामध्ये काँग्रेसचे अधिकृत चार व एक पुरस्कृत अपक्ष असे पाच उमेदवार आहेत. याआधी गांधी घराण्यातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा झाल्या असून, एक महिन्यापूर्वी राहुल गांधी हेही संविधान संमेलनानिमित्त कोल्हापुरात आले होते. मात्र, प्रियांका गांधी प्रथमच पक्षाच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येत आहेत.