संघटनेपेक्षा मोठा नाही, आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 18:51 IST2024-10-26T18:50:30+5:302024-10-26T18:51:53+5:30
कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, संघटनेला आवश्यकता वाटली, तर ‘ शिरोळ’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे संकेत संघटनेचे ...

संघटनेपेक्षा मोठा नाही, आवश्यकता वाटली तर निवडणूक रिंगणात उतरु - राजू शेट्टी
कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, संघटनेला आवश्यकता वाटली, तर ‘शिरोळ’मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असे संकेत संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिले.
राजू शेट्टी म्हणाले, राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’च्या माध्यमातून सक्षम तिसरा पर्याय दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह ‘हातकणंगले’, ‘कोल्हापूर दक्षिण’, ‘करवीर’, ‘कागल’, ‘चंदगड’ व ‘शाहूवाडी’ येथे उमेदवार देणार आहे. ‘शिरोळ’मधून आपल्या नावाची चर्चा आहे, हे खरे आहे. संघटनेला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, त्यास आपण बांधील राहू. संघटनेपेक्षा आपण मोठा नाही, त्याच्यासाठी पणाला लागणार असलो तरी हरकत नाही.
सावकारांचा स्वभाव तापट
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांचा स्वभाव काहीसा तापट आहे. ते अजिबात नाराज नसून काही जण चुकीची माहिती बाहेर देत आहेत, हे तुम्हाला लवकरच समजेल, असे शेट्टी यांनी सांगितले.