Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात १७ जणांचा थोडक्यात हुकला गुलाल; चिकोडे, सरनाईक, डवरे, दीपा मगदूम यांचा ‘नोटा’ने केला घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 16:56 IST2026-01-17T16:56:28+5:302026-01-17T16:56:57+5:30

काँग्रेसच्या सरोज सरनाईक अवघ्या १६ मतांनी पराभूत

Kolhapur Municipal Election Results 2026 17 candidates were defeated by a very small margin of votes | Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात १७ जणांचा थोडक्यात हुकला गुलाल; चिकोडे, सरनाईक, डवरे, दीपा मगदूम यांचा ‘नोटा’ने केला घात

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापुरात १७ जणांचा थोडक्यात हुकला गुलाल; चिकोडे, सरनाईक, डवरे, दीपा मगदूम यांचा ‘नोटा’ने केला घात

कोल्हापूर : महापालिकेच्या ७१ जागांपैकी तब्बल १७ जणांचा अगदी थोड्या मतांनी गुलाल हुकला आहे. राहुल चिकोडे, सरोज सरनाईक, प्रेमा डवरे यांच्यासह दीपा मगदूम यांचा ‘नोटा’ने घात केला. यामध्ये काँग्रेसच्या सरोज सरनाईक अवघ्या १६ मतांनी पराभूत झाल्या आणि त्याठिकाणी ‘नोटा’ला ३२५ मते मिळाली.

चार प्रभाग रचनेमुळे अनेकांची गणिते चुकली असून, त्यामध्ये ‘नोटा’ व ‘अपक्षांनी’ अनेकांना झटका दिला. दीपा दिलीप मगदूम यांचा अवघ्या १६३ मतांनी पराभव झाला, येथे ३५५ ‘नोटा’ला पडली. प्रेमा डवरे या १९९ मतांनी पराभूत झाल्या. तिथे ९०१ नोटाला पडली. प्रकाश नाईकनवरे यांना ९८ मते कमी पडली, तिथे तब्बल ३७१ मते नोटाला मिळाली. त्याशिवाय, १४ ठिकाणी अपक्षांमुळे दिग्गजांचा गुलाल हुकला.

विजय सरदार यांना सर्वाधिक मते

काेल्हापूर शहरात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या अपक्ष विजय साळोखे-सरदार यांना सर्वाधिक ६४१८ मते मिळाली. कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद नसताना त्यांनी ही मते घेतली.

नोटा’ने फटका बसलेले उमेदवार...

उमेदवाराचे नाव  - पराभव - नोटा

  • दीपक कांबळे -  ५३८ - ३५३
  • मनाली पाटील  -  ४०५ -  ४९६
  • सरोज सरनाईक - १६ - ३२५
  • तनिष्का सावंत - ४९१ - ३७९
  • हेमंत कांदेकर - ३६३  - २२९
  • दीपा मगदूम - १६३  - ३५५
  • राहुल इंगवले  - ७१३  - ३५८
  • यशोदा आवळे - २५७  - ३०४
  • प्रेमा डवरे - १९९ -  ९०१
  • प्रकाश नाईकनवरे - ९८  - ३७१
  • अश्विनी कदम -  २८१ - २१७
  • विलास वास्कर  - ३७२  - ४४१
  • अपर्णा पोवार  - २९९  - ३८४
  • राहुल चिकोडे -  ४१ - २९०
  • शुभांगी पोवार -  ६७५ -  ५२०
  • रेणू माने  - ५४६ - ४२७
  • सुषमा जाधव - २९३  -  ७३३

Web Title : कोल्हापुर चुनाव: नोटा ने 17 उम्मीदवारों की जीत के अंतर को प्रभावित किया

Web Summary : कोल्हापुर चुनाव में 17 उम्मीदवार मामूली अंतर से हार गए। नोटा निर्णायक साबित हुआ, जिसने चिक्कोडे और मगदूम जैसे उम्मीदवारों को प्रभावित किया। निर्दलीय विजय सालोखे-सरदार को सर्वाधिक वोट मिले।

Web Title : Kolhapur Election: NOTA Impacts 17 Candidates' Victory Margins Narrowly

Web Summary : Kolhapur election saw 17 candidates narrowly miss victory. NOTA proved decisive, impacting candidates like Chikkode and Magdum. Independent Vijay Salokhe-Sardar secured highest votes.