कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 19:15 IST2022-02-09T19:09:39+5:302022-02-09T19:15:03+5:30
वयाच्या 36 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने कागल व परिसरात हळहळ

कागल नगरपरिषदेचे नगरसेवक विशाल पाटील-मळगेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कागल : नगरपरिषदेतील भाजपाचे गटनेते राहिलेले नगरसेवक विशाल नामदेवराव पाटील मळगेकर यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या 36 व्या वर्षी एका तरूण उमद्या कार्यकर्त्याच्या अचानक जाण्याने कागल व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी, एक वर्षाचा मुलगा, तीन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.
विशाल पाटील हे राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालकही होते. कागल सकल मराठा समाजाचे उपाध्यक्ष तसेच विविध संस्था मंडळावर ते पदाधिकारी होते.
सकाळच्या सुमारास घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. दुपारी चारच्या सुमारास कोल्हापुरातुन मृतदेह गहिनीनाथ नगर मधील निवासस्थानी आणण्यात आला. तेथुन अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शेकडो कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.