Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:08 IST2026-01-13T18:07:56+5:302026-01-13T18:08:38+5:30

७४ आर्थिक संवेदनशील केंद्रे असून, त्यावर वेब कास्टिंग करण्यात येणार

Ichalkaranji Municipal Corporation results to be announced in three hours Preparations for voting and counting complete | Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण

इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. १६ प्रभागांतील मतमोजणी चार विभागांमध्ये प्रत्येकी ८ टेबलांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अंतिम निकाल तीन तासांमध्ये हाती येईल. या निवडणुकीसाठी सुमारे १६०० अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ७४ आर्थिक संवेदनशील ठिकाणी वेब कास्टिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १६ प्रभागांतील २३० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २ लाख ४८ हजार ९०७ मतदारांसाठी ३०२ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २१ झोनल अधिकारी असणार आहेत. प्रत्येक २ तासाला मतदानाची आकडेवारी ते कळवतील. मतपेट्यांचे वाटप, संकलन आणि मतमोजणी ४ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे. ७४ आर्थिक संवेदनशील केंद्रे असून, त्यावर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. 

६०० पोलिस अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. शहरामध्ये एकही संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील केंद्र नाही. ईव्हीएम मशीनच्या कमिशनिंगचे काम पूर्ण झाले आहे. १० टक्के मशीनरी राखीव ठेवल्या आहेत. केंद्रांवरील निवडणूक कर्मचाऱ्यांना २ प्रशिक्षणे देण्यात आली असून, अंतिम प्रशिक्षण आदल्या दिवशी देण्यात येईल. राजीव गांधी भवनमध्ये मतदान यंत्रे स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान मशिनरी घेऊन जाण्यासाठी ७२ वाहनांची व्यवस्था केली आहे. २ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, ३ दिवस याठिकाणी उपस्थित असणार आहेत.

मतमोजणी प्रक्रिया

राजीव गांधी भवनमध्ये शुक्रवारी (दि.१६) सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल. मतमोजणी पहिल्या व तळमजल्यावर होणार आहे. ४ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एकाच वेळी ४ ठिकाणी मतमोजणीस सुरुवात होईल.

प्रत्येक फेरीला एका प्रभागातील २ ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजले जाईल. म्हणजेच एका विभागात ८ टेबलांद्वारे मतमोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक फेरीत ३२ ईव्हीएम मशीनवरील मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक उमेदवाराच्या २ प्रतिनिधींना मतमोजणीसाठी प्रवेश दिला जाईल.

एकाच वेळी मतमोजणीस सुरुवात

८ ते ११ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होईल. एकाचवेळी सर्व १६ प्रभागांतील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ज्या प्रभागात मतपेट्या कमी आहेत, त्यांचा निकाल लवकर लागणार आहे. प्रभाग क्रमांक ४ चा निकाल सर्वांत पहिला, तर प्रभाग १६ चा निकाल सर्वांत शेवटी लागेल. टपाली मतदानही या मतमोजणीसोबतच मोजली जाणार आहेत.

१३७२ दुबार मतदार

आयोगाने ८ हजार ७९८ संभाव्य दुबार मतदारांची यादी दिली होती. त्याची पडताळणी केली असता त्यामध्ये १३७२ दुबार मतदार असल्याचे आढळून आले. ११९९ दुबार मतदारांनी कुठे मतदान करणार, याचे स्वयंघोषणापत्र लिहून दिले आहे. उर्वरित १५२२ मतदारांच्या नावासमोर दुबार शिक्का मारण्यात आला आहे.

दृष्टीक्षेपात

  • जागा - ६५
  • प्रभाग संख्या - १६
  • मतदार - २ लाख ४८ हजार ९०७
  • केंद्रे - ३०२
  • उमेदवार - २३०
  • कंट्रोल युनिट - ३६७ (राखीवसह)
  • बॅलेट युनिट - ७१३ (राखीवसह)
  • नियुक्त कर्मचारी - १६००
  • पोलिस कर्मचारी - ६००
  • झोनल अधिकारी - २१
  • आर्थिक संवेदनशील केंद्रे - ७४


विभाग संख्या - ४

  • एक विभाग - ८ टेबल
  • फेरींची संख्या - ८ ते ११


कितव्या फेरीत निकाल?

प्रभाग क्रमांक - फेरी

  • १,२,३,४ -  ८
  • ५,१०,११,१४  - ९
  • ८,९,१२,१३,१५,१६ - १०
  • ६,७ - ११

Web Title : इचलकरंजी नगर पालिका चुनाव 2026: तीन घंटे में नतीजे; तैयारी पूरी।

Web Summary : इचलकरंजी नगर पालिका चुनाव की तैयारी पूरी; तीन घंटे में नतीजे आने की उम्मीद। मतदान 15 तारीख को, 230 उम्मीदवार मैदान में। गिनती 16 तारीख को सुबह 10 बजे शुरू। 1600 कर्मचारी और 600 पुलिस अधिकारी तैनात।

Web Title : Ichalkaranji Municipal Election 2026: Results in three hours; preparations complete.

Web Summary : Ichalkaranji Municipal election preparations are complete; results are expected within three hours. Voting is on the 15th, with 230 candidates. Counting starts 10 AM on the 16th. 1600 staff and 600 police officers are deployed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.