संतापजनक; गर्भवती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण, गर्भपात झाल्याने पतीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 11:19 IST2021-12-25T11:19:08+5:302021-12-25T11:19:49+5:30

मुबिनाने यासीन याच्याकडून शारीरिक व मानसिक छळासह पैसे व दागिने आणण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Husband beats pregnant wife Accused of having an abortion in Ichalkaranji Kolhapur District | संतापजनक; गर्भवती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण, गर्भपात झाल्याने पतीवर गुन्हा दाखल

संतापजनक; गर्भवती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण, गर्भपात झाल्याने पतीवर गुन्हा दाखल

इचलकरंजी : येथील आसरानगर परिसरात किरकोळ कारणावरून पतीने लाथाबुक्क्यांसह पट्ट्याने पत्नीस मारहाण केल्याने तिचा गर्भपात झाल्याची घटना घडली. याप्रकरणी यासीन मन्सूर नदाफ (वय २६, रा. आसरानगर, गल्ली नं. ११) याच्यावर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, यासीन व मुबिना नदाफ या दाम्पत्यामध्ये सन २०१७ पासून वाद सुरू आहे. किरकोळ कारणावरून वाद घालत यासीन हा पत्नीची आई व भाऊ यांना ठार मारण्याची धमकी देत होता. तसेच पत्नीला माहेरी व अन्य नातेवाइकांकडे जाण्यास नकार देत होता. २२ डिसेंबरला या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

त्यातून चिडून यासीन याने मुबीनला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कमरपट्ट्याने मारले. मुबिना ही गर्भवती असल्याने तिला गंभीर दुखापत होऊन तिचा गर्भपात झाला. याप्रकरणी मुबिनाने यासीन याच्याकडून शारीरिक व मानसिक छळासह पैसे व दागिने आणण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Husband beats pregnant wife Accused of having an abortion in Ichalkaranji Kolhapur District