Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पडत्या काळात एकनिष्ठ; उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:28 IST2024-04-05T12:26:28+5:302024-04-05T12:28:34+5:30

कोल्हापूर : सत्यजित हा लढाऊ शिवसैनिक आहे. तो पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिला. म्हणूनच सत्यजितसाठी मी पूर्ण ताकद लावणार ...

Hatkanangle LokSabha Constituency: Shiv Sena chief Uddhav Thackeray praised Satyajit Patil | Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पडत्या काळात एकनिष्ठ; उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

Hatkanangle LokSabha Constituency: सत्यजित पडत्या काळात एकनिष्ठ; उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

कोल्हापूर : सत्यजित हा लढाऊ शिवसैनिक आहे. तो पडत्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिला. म्हणूनच सत्यजितसाठी मी पूर्ण ताकद लावणार आहे. सर्वांनी अशा उमेदवाराच्या पाठीशी राहून त्याला निवडून आणूया, अशा सदिच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिल्या.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून उद्धवसेनेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी मुंबईत समर्थकांसह 'मातोश्री' वर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. मी पूर्ण विचाराअंती सत्यजित पाटील यांची उमेदवारी दिली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

सत्यजित पाटील म्हणाले, माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवून मोठी जबाबदारी दिली आहे. मी सर्वांच्या साथीने विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर, शिवसेनेचे राज्य संघटक चंगेजखान पठाण, जिल्हाप्रमुख संजय चौगले, वैभव उगळे, सांगली जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, उपजिल्हा प्रमुख नामदेव गिरी, मधुकर पाटील, शाहूवाडी संपर्क प्रमुख आनंद भेडसे, धनंजय पाटील, बाजीराव कळंत्रे, तानाजी मालुसरे आदी प्रमुख कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Hatkanangle LokSabha Constituency: Shiv Sena chief Uddhav Thackeray praised Satyajit Patil