कुंभोज येथील तरूणाचा कोकण कृषी विद्यापीठात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:24 IST2019-09-25T11:16:30+5:302019-09-25T11:24:40+5:30

दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पी.एच.डी चा विद्यार्थी संतोष मारुती पांडव (३२) या तरूणाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Death of a young girl at Konkan Agricultural University | कुंभोज येथील तरूणाचा कोकण कृषी विद्यापीठात मृत्यू

कुंभोज येथील तरूणाचा कोकण कृषी विद्यापीठात मृत्यू

ठळक मुद्देकोकण कृषी विद्यापीठातील तरूणाचा मृत्यूसंतोष मूळचा कोल्हापूर तालुक्यातील कुंभोज (ता. हातकणंगले) येथील

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठातील पी.एच.डी चा विद्यार्थी संतोष मारुती पांडव (३२) या तरूणाचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. संतोष दापोली कृषी महाविद्यालयातील वनस्पती विकृती शास्त्र विभागाचा विद्यार्थी होता.

संतोष मूळचा कोल्हापूर तालुक्यातील कुंभोज (ता. हातकणंगले) येथील राहणार आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात तो शिकत असल्याने दापोलीतच राहत होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे त्याच्यासमवेत राहणाऱ्या मित्रांना धक्काच बसला.

Web Title: Death of a young girl at Konkan Agricultural University