देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 18:52 IST2022-02-15T15:56:51+5:302022-02-15T18:52:18+5:30
लक्ष्मी यांना अंथरुणावरुन उठता येत नसल्याने आगीत त्या पुर्णपणे भाजल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

देवाऱ्यातील दिवा अंथरूणावर पडून लागली आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू; चंदगड तालुक्यातील घटना
चंदगड : देवाऱ्यावरील दिवा अंथरूणावर पडून अंथरूणाला लागलेल्या आगीत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे ही घटना घडली. लक्ष्मी मारुती गोवेकर (वय ८८, रा. तुर्केवाडी) असे या मृत वृद्धेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची माहिती अशी की, लक्ष्मी या आपल्या सुनेसोबत राहतात. वृद्धापकाळाने त्या अंथरूणावर झोपून असतात. काल, रविवारी त्या घरी एकट्याच होत्या. यावेळी देव्हाऱ्यावरील दिवा त्यांच्या अंथरुणावर पडला. दिवा अंथरुणावर पडल्याने अंथरुणाला आग लागली.
लक्ष्मी यांना अंथरुणावरुन उठता येत नसल्याने आगीत त्या पुर्णपणे भाजल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद सून जानकू धोंडिबा गोवेकर यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.