Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांनी मिरवणुकीने भरला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 16:19 IST2019-10-04T16:17:37+5:302019-10-04T16:19:21+5:30
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र्तपणे भाग घेतला.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत जाधव यांनी मिरवणुकीने भरला अर्ज
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी मिरवणुकीने जाऊन आपले नामनिर्देशन पत्र भरले. जाधव यांच्या मिरवणुकीत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांसह जाधव समर्थकांनी या मिरवणुकीत उत्स्फू र्तपणे भाग घेतला.
सकाळी ११ वाजता दसरा चौक येथे कॉँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. त्या ठिकाणाहून मिरवणुकीने शक्तिप्रदर्शन करीत सर्व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचले. कार्यकर्त्यांनी डोक्यावर तिरंगी टोेपी, गळ्यात स्कार्फ, हातांत ध्वज घेतले होते.
चंद्रकांत जाधव यांचे नामनिर्देशन पत्र भरण्याकरिता जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, महापौर माधवी गवंडी, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, बाजीराव खाडे, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, आनंद माने, नगरसेवक संभाजी जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.