Kolhapur: बेपत्ता माजी सरपंचाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरुच; महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 15:37 IST2024-08-03T15:36:42+5:302024-08-03T15:37:45+5:30

गणपती कोळी कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ ) येथील कृष्णा नदीच्या महापुरात ट्रॅक्टर उलटल्याने पाण्यातून वाहून बेपत्ता झालेले अकिवाट ...

Body of missing ex-sarpanch found, search for one continues; The trolley was overturned in the deluge in Kolhapur | Kolhapur: बेपत्ता माजी सरपंचाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरुच; महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून

Kolhapur: बेपत्ता माजी सरपंचाचा मृतदेह सापडला, एकाचा शोध सुरुच; महापुरात ट्रॉली उलटून गेले होते वाहून

गणपती कोळी

कुरुंदवाड : अकिवाट (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीच्या महापुरात ट्रॅक्टर उलटल्याने पाण्यातून वाहून बेपत्ता झालेले अकिवाट गावचे माजी सरपंच आण्णासो हसुरे यांचा मृतदेह राजापूर ओतात (ओढा) वजीर रेस्कू फोर्सला सापडला. तर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरगदार अद्याप बेपत्ता असून रेस्कू फोर्स, एनडीआरएफ, व्हाइट आर्मीच्या जवानांचे दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे.

काल, शुक्रवारी अकिवाट बस्तवाड रस्त्यावर कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर उलटल्याने नऊ जण बुडाले होते. यात एकाचा मृत्यू झाला. तर सात जण बचावले होते. दोघे बेपत्ता असल्याने एकूण सात यांत्रिक बोटींच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू होती. आज, शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरु असताना वजीर रेस्कू फोर्सला बेपत्ता हसुरे यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. बोटीतून मृतदेह बाहेर आणताच नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळजी पिळवटून टाकणारा होता.

Web Title: Body of missing ex-sarpanch found, search for one continues; The trolley was overturned in the deluge in Kolhapur