चंदगड: स्वप्नवेल पॉईंटजवळ आढळला मृतदेह, पोलिसांनी सुरु केला तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 14:29 IST2022-06-10T14:14:25+5:302022-06-10T14:29:01+5:30
कॅनॉलच्या पुलाखालील बाजूस जंगलांमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आला मृतदेह

चंदगड: स्वप्नवेल पॉईंटजवळ आढळला मृतदेह, पोलिसांनी सुरु केला तपास
चंदगड : कळसगादे गावानजीक असणाऱ्या स्वप्नवेल पॉईंटजवळ जंगलांमध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. कॅनोलच्या पुलाखाली हा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली. अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत अनोळखी पुरुषाचे अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष असण्याची शक्यता आहे. मृताच्या अंगात बारीक चेक्सचा फिकट चॉकलेटी रंगाचा टी-शर्ट व काळे रंगाचे स्पोर्ट नाईट पॅन्ट आहे. उजव्या हाताच्या मनगटावर त्रिशूळ डमरू, सापाचे चित्र गोंदलेले आहे.
हा मृतदेह कॅनॉलच्या पुलाखालील बाजूस जंगलांमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळून आल्याचे कळसगादेचे पोलीस पाटील सदानंद विठ्ठल सुतार यांनी चंदगड पोलिसांना कळविले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानुसार चंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.