Kolhapur: नगराध्यक्षपद खुले, चंदगडमध्ये चुरशीचा सामना होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:59 IST2025-10-07T17:59:28+5:302025-10-07T17:59:58+5:30
चंदगड शहर विकास आघाडी कोणती रणनीती आखणार यावर निकाल ठरणार

Kolhapur: नगराध्यक्षपद खुले, चंदगडमध्ये चुरशीचा सामना होणार
चंदगड : येथील नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे चुरशीचा सामना होणार आहे.
गेल्या वेळी चंदगड शहर विकास आघाडीने अनेक गटांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्षपद मिळविले होते. गेल्या वेळीचा वचपा काढण्यासाठी भाजपकडूनही यावेळी आधीच व्यूहरचना करण्यात आली असून त्याला भेदण्यासाठी चंदगड शहर विकास आघाडी कोणती रणनीती आखणार यावर निकाल ठरणार आहे.
तसेच अनेक कार्यकर्ते वैयक्तिकही तयार करत आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाला किंवा गटालाही निवडणूक सोपी नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, चंदगड अर्बन बँकेचे संचालक सुनील काणेकर, सुरेश सातवणेकर, माजी नगरसेवक विजय कडूकर, चंदगड शहर विकास आघाडीकडून दयानंद काणेकर, माजी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यासह अनेक जण इच्छुक आहेत.