Kolhapur: राऊतवाडीत सेल्फीच्या नादात वाहत गेलेल्या युवकास वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:30 IST2025-06-23T15:29:39+5:302025-06-23T15:30:23+5:30

पर्यटकांची तोबा गर्दी, धबधबा मार्गावर वाहनांच्या रांगा

A young man who was swept away by the sound of a selfie in Rautwadi was saved | Kolhapur: राऊतवाडीत सेल्फीच्या नादात वाहत गेलेल्या युवकास वाचविले

Kolhapur: राऊतवाडीत सेल्फीच्या नादात वाहत गेलेल्या युवकास वाचविले

राधानगरी : राऊतवाडी धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाला असून, अनेक पर्यटक भेट देत आहेत. धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुण दगडावरून पाय घसरून पडला. यावेळी तो वाहून जात असताना काही तरुणांनी वाचविले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. 

राधानगरी येथील राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी काही तरुण आले होते. या ठिकाणी असलेल्या मोठ्या दगडावर सेल्फी घेत असताना एक तरुण पाय घसरून पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून जाऊ लागला. यावेळी त्याच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत त्याला वाचविले.

पर्यटकांची तोबा गर्दी, धबधबा मार्गावर वाहनांच्या रांगा

चार दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने पूर्णक्षमतेने राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला असून, धबधबा पाहण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. धबधब्यापासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर वाहणाच्या लांबच लांब रंगा पाहाव्यास मिळाल्या. हुल्लडबाजी करणाऱ्या चार पर्यटकांवर निर्भया पथक शाहुवाडी यांच्याकडून कारवाई करण्यात आली.

Web Title: A young man who was swept away by the sound of a selfie in Rautwadi was saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.