कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:23 IST2025-09-05T18:22:34+5:302025-09-05T18:23:16+5:30

कोल्हापूर : दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगतर्फे गणेशोत्सवानिमित्त १२ बाय ३६ फूट आकारात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावरील रांगोळी रेखाटण्यात आली असून, ...

A grand Rangoli exhibition on the theme of Operation Sindoor on the occasion of Ganeshotsav in Kolhapur | कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन

कोल्हापुरात गणेशोत्सवानिमित्त 'ऑपरेशन सिंदूर' विषयावरील भव्य रांगोळीचे प्रदर्शन

कोल्हापूर: दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगतर्फे गणेशोत्सवानिमित्त १२ बाय ३६ फूट आकारात ‘ऑपरेशन सिंदूर’ विषयावरील रांगोळी रेखाटण्यात आली असून, ही रांगोळी नागरिकांना पाहण्यासाठी खुली झाली आहे. आंतरराष्ट्रीय रंगावलीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी रांगोळी रेखाटली असून, त्यांना जे.डी. मोरे, चंद्रलेखा वेल्हाळ यांचे सहकार्य लाभले आहे.

पहेलगाम येथील भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून यशस्वी झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर'वर आधारित या रांगोळीत हल्ल्यांतील पर्यटक, त्यांच्या कुटुंबियांना झालेले दुःख, भारतीय सैन्य, राफेल विमान, ब्रह्मोस अस्त्र रॉकेट्स, योमिका सिंह, सोफिया कुरैशी, भारतीय ध्वज, अशोक चक्र, भारताचा नकाशा या व अन्य चित्रांचा समावेश आहे.

Web Title: A grand Rangoli exhibition on the theme of Operation Sindoor on the occasion of Ganeshotsav in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.