उल्हासनगर: युती फलदायी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 07:47 IST2026-01-17T07:46:42+5:302026-01-17T07:47:00+5:30

स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडला.

Ulhasnagar Polls Omi Kalani Shinde Sena Tie up Failed to Recreate the 2017 BJP Magic | उल्हासनगर: युती फलदायी नाही

उल्हासनगर: युती फलदायी नाही

उल्हासनगर : मागील पालिका निवडणुकीत ओमी कलानी व भाजप यांनी केलेली युती जेवढी यशस्वी ठरली तेवढी शिंदेसेना ओमी कलानी व साई पक्षाची युती यशस्वी ठरलेली नाही. सिंधीबहुल परिसरात साई पक्षाची वाताहत झाली व भाजपला यश मिळाले. त्याचा फटका या युतीला बसला. स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडला. उल्हासनगरात ओमी कलानी यांच्या विजयी उमेदवारांमुळे शिंदेसेनेचे संख्याबळ लक्षणीय झाले.

धरसोड प्रवृत्तीचा फटका 

उल्हासनगरात धरसोड प्रवृत्तीचा फटका शिंदेसेनेला काही प्रमाणात बसला. ओमी कलानी यांचे नगरसेवक मोठ्या संख्येने विजयी झाल्याचा लाभ शिंदेसेनेला झाला. यंदा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येत आहे. 

भाजप ३७

शिंदेसेना, ओमी कलानी युती ३६ 

काँग्रेस १

राष्ट्रवादी अजित पवार ०

राष्ट्रवादी शरद पवार ०

उद्धवसेना ० 

मनसे ० 

वंचित २ 

साईपक्ष १

इतर १

Web Title : उल्हासनगर: गठबंधन निष्फल; भाजपा को अकेले लड़ने से लाभ

Web Summary : उल्हासनगर के राजनीतिक परिदृश्य में बदलाव आया। पिछले गठबंधन विफल रहे। भाजपा का अकेले लड़ने का निर्णय फायदेमंद साबित हुआ, 37 सीटें हासिल हुईं। शिंदे सेना और ओमी कलानी गठबंधन को 36 सीटें मिलीं। कांग्रेस, एनसीपी, उद्धव सेना, मनसे को नुकसान हुआ।

Web Title : Ulhasnagar: Alliance Unfruitful; BJP Gains from Solo Fight

Web Summary : Ulhasnagar's political landscape saw a shift. Previous alliances faltered. BJP's solo decision proved beneficial, securing 37 seats. Shinde Sena and Omi Kalani alliance got 36 seats. Congress, NCP, Uddhav Sena, MNS faced setbacks.