'शिसारी'वर राजू पाटील म्हणाले, मनसेचे नगरसेवक फुटू नये म्हणून शिंदेसेनेशी युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:03 IST2026-01-25T11:01:53+5:302026-01-25T11:03:01+5:30

Raju Patil News: मुंबईसह कल्याण - डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून शिसारी येते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मनसेचे माजी आ. राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Raju Patil on 'Shisari' said, alliance with Shinde Sena to prevent MNS corporators from splitting | 'शिसारी'वर राजू पाटील म्हणाले, मनसेचे नगरसेवक फुटू नये म्हणून शिंदेसेनेशी युती

'शिसारी'वर राजू पाटील म्हणाले, मनसेचे नगरसेवक फुटू नये म्हणून शिंदेसेनेशी युती

कल्याण - मुंबईसह कल्याण - डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून शिसारी येते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मनसेचे माजी आ. राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मनसे नगरसेवकांना भाजपकडून कॉल येत आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक फुटू नयेत, त्यांना वाचवण्यासाठी शिंदेसेनेशी युती केल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला.

फक्त पाठिंबा दिला, सत्तेत गेलो नाही
शिंदेसेनेशी केलेली युती स्वार्थासाठी नव्हे, तर पक्ष हितासाठी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी त्याची कल्पना पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिल्याचेही पाटील यांनी सांगितले. शिंदेसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्यासोबत सामील झालो नाही. सत्तेत सहभागी होण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी निर्णय घेतला. भाजपला मनसेविषयी बोलण्याचा अधिकार नाही.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा
राजकारणात संधी प्रत्येकाला मिळत असते. कोणी मित्र-मित्र म्हणून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष फोडला. एक पक्ष सातत्याने माझा पक्ष फोडत असेल तर हे समजण्यासाठी मी बालबुद्धीचा नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.

Web Title : पार्षदों को बचाने के लिए शिंदे सेना से मनसे का गठबंधन: राजू पाटिल

Web Summary : राजू पाटिल ने स्पष्ट किया कि मनसे ने भाजपा के प्रयासों के कारण पार्षदों को दल-बदल से रोकने के लिए शिंदे सेना के साथ गठबंधन किया। उन्होंने कहा कि राज ठाकरे को इस निर्णय से अवगत कराया गया था और इसका उद्देश्य मनसे पार्षदों के लिए न्याय सुनिश्चित करना है, न कि स्वार्थी लाभ। पाटिल ने भाजपा के रवींद्र चव्हाण की आलोचना की, लेकिन सीधे तौर पर उनका नाम नहीं लिया।

Web Title : MNS aligned with Shinde's Sena to protect corporators: Raju Patil

Web Summary : Raju Patil clarified MNS allied with Shinde's Sena to prevent corporators from defecting due to BJP overtures. He stated the decision was communicated to Raj Thackeray and aims to secure justice for MNS corporators, not for selfish gains. Patil criticized BJP's Ravindra Chavan without directly naming him.