जुन्याच चेहऱ्यांनाच पुन्हा संधी; कल्याण-डोंबिवलीत बहुतांश नेत्यांच्या घरातच तिकिटे; ४९० हून अधिक उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:05 IST2026-01-09T16:04:20+5:302026-01-09T16:05:31+5:30

शिंदेसेनेकडून आ. विश्वनाथ भोईर यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तर त्यांचे दुसरे भाऊ जयवंत भोईर हे पुन्हा रिंगणात आहेत.

New opportunity for old faces Tickets at the homes of most leaders in Kalyan-Dombivli; More than 490 candidates in the fray | जुन्याच चेहऱ्यांनाच पुन्हा संधी; कल्याण-डोंबिवलीत बहुतांश नेत्यांच्या घरातच तिकिटे; ४९० हून अधिक उमेदवार रिंगणात

जुन्याच चेहऱ्यांनाच पुन्हा संधी; कल्याण-डोंबिवलीत बहुतांश नेत्यांच्या घरातच तिकिटे; ४९० हून अधिक उमेदवार रिंगणात


कल्याण : कल्याण - डाेंबिवली पालिका निवडणुकीत ४९०पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी ६० पेक्षा जास्त माजी नगरसेवकांना भाजप, शिंदेसेनेकडून उमेदवारी दिली गेली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात काही ठिकाणी बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे.

शिंदेसेनेकडून आ. विश्वनाथ भोईर यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, तर त्यांचे दुसरे भाऊ जयवंत भोईर हे पुन्हा रिंगणात आहेत. मयुर पाटील, गणेश कोट, नीलिमा पाटील, वैजयंती घाेलप, संजय पाटील, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, नीलेश शिंदे, दीपाली पाटील, महेश गायकवाड, पूजा म्हात्रे, रमेश जाधव, माधुरी काळे, ज्योती मराठे, सचिन पाेटे, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे, कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली.

ठाणे महापालिकेत पुन्हा तेच चेहरे दिसणार -
ठाणे पालिका निवडणुकीत यंदा ६४९ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्यक्षात पालिकेवर १३१ उमेदवार निवडून जाणार आहेत. असे असले तरी या निवडणुकीत मागील निवडणुकीत निवडून आलेले सुमारे ७० टक्के माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरले आहेत, तर १० टक्के माजी नगरसेवक हे त्या आधीच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यामुळे २० टक्के नव्या चेहऱ्यांना किंवा घरातील सदस्यांनाच संधी दिली आहे.यात शिंदेसेनेतील माजी नगरेसवकांची संख्या अधिक असून त्या खालोखाल भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) तील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. 

६० पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे भाजप, शिंदेसेनेतर्फे पालिका निवडणूक लढवित आहेत. काही ठिकाणी मात्र बंडखोरी झाली आहे.

हे आजमावणार नशीब -
माजी महापौर दिवंगत राजेंद्र देवळेकर यांच्या पत्नी अनघा देवळेकर, तर दिवंगत नगरसेवक प्रकाश पेणकर यांच्या मुलाला उमेदवारी दिली गेली आहे. माजी नगरसेविका वीणा जाधव यांचे पती गणेश जाधव रिंगणात आहेत. 

भाजपकडून उपेक्षा भोईर, वरुण पाटील, राहुल दामले, विक्रम तरे, दया गायकवाड, रेखा चौधरी, साई शेलार, मंदार टावरे, मंदार हळबे, जालिंदर पाटील, मोरेश्वर भाेईर, इंदिरा तरे, रविना माळी, मुकुंद पेडणेकर,  संदीप पुराणिक, नंदू म्हात्रे, हर्षदा भोईर यांच्यासह माजी नगरसेवक मनोज राय यांच्या पत्नी सरोज राय, माजी नगरसेवक सचिन खेमा यांच्या पत्नी मेघा खेमा, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या सुनेला भाजपने रिंगणात उतरविले आहे. 

वाघमारे, उगले यांना उमेदवारी नाकारली -
मनसेकडून उल्हास भोईर, भाजपमधून मनसेत आलेले शैलेश धात्रक, मनीषा धात्रक हे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल मंढारी या  निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये गेल्या. त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेची कास धरली. आता त्या मनसेकडून लढत आहे.

माजी नगरसेविका रजनी मिरकुटे, छाया वाघमारे, मोहन उगले. सुशिला माळी आदींना त्यांच्या पक्षाने उमेदवारी नाकारली. उद्धवसेनेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, शरद पाटील, उदय रसाळ, उमेश बोरगावकर यांच्यासह माजी नगरसेवक दया शेट्टी यांची पत्नी लढत आहे.

 माजी नगरसेविका रजनी मिरकुटे, छाया वाघमारे, मोहन उगले. सुशिला माळी आदींना त्यांच्या पक्षाने उमेदवारी नाकारली. उद्धवसेनेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, शरद पाटील, उदय रसाळ, उमेश बोरगावकर यांच्यासह माजी नगरसेवक दया शेट्टी यांची पत्नी आदी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Web Title: New opportunity for old faces Tickets at the homes of most leaders in Kalyan-Dombivli; More than 490 candidates in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.