KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:36 IST2025-12-31T16:17:08+5:302025-12-31T16:36:43+5:30
Kalyan Dombivli Municipal Election Result 2026: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाला मोठी खूशखबर मिळाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध
Kalyan Dombivli Municipal Election 2026 Winners: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाला मोठी खूशखबर मिळाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन ठिकाणी भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगपालिका क्षेत्रामध्ये आसावरी नवरे, रेखा चौधरी आणि रंजना पेणकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच भाजपाच्या खात्यात तीन जागा जमा झाल्या आहेत.
कल्याण डोंबिवलीमधील प्रभाग क्रमांक १८ अ मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून रेखा चौधरी (Rekha Chaudhary) यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे येथून रेखा चौधरी या मतदानापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या. तर प्रभाग क्रमांक २६ क मधून भाजपाच्या आसावरी नवरे (Asawari Navare) यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. विरोधात उमेदवारच नसल्याने आसावरी नवरे यांचाही बिनविरोध विज निश्चित झाला आहे.
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'.
त्याशिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाच्या रंजना पेणकर (Ranjana Penkar) ह्या प्रभाग क्रमांक २६ ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथेही भाजपा उमेदवारा व्यतिरिक्त कुणीही उमेदवारी दाखल केली नव्हती. त्यामुळे निकालाआधीच भाजपाच्या खात्यात तीन जागा जमा झाल्या आहेत.