Kalyan Lok Sabha Election Live कल्याणमध्ये मतदारयाद्यांमध्ये घोळ कायम; मतदार मतदानापासून वंचित

By प्रशांत माने | Published: May 20, 2024 09:42 AM2024-05-20T09:42:15+5:302024-05-20T09:43:08+5:30

मतदान केंद्रांच्या अवतीभवती लागलेल्या बुथवर आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय.

kalyan lok sabha election 2024 confusion persists in voter list in kalyan voter disenfranchised | Kalyan Lok Sabha Election Live कल्याणमध्ये मतदारयाद्यांमध्ये घोळ कायम; मतदार मतदानापासून वंचित

Kalyan Lok Sabha Election Live कल्याणमध्ये मतदारयाद्यांमध्ये घोळ कायम; मतदार मतदानापासून वंचित

प्रशांत माने, कल्याणमतदार याद्यांमधील घोळ कायम असल्याने बहुतांश मतदार मतदानापासून वंचित राहत आहेत. एकिकडे मतदान करा असे आवाहन करायचे तर दुसरीकडे घोळ कायम ठेवायचे अशा शब्दांत मतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. विशेषकरून जूनी नावे मतदार यादीतून गहाळ झाली असून ज्यांनी नव्याने नोंदणी केलीय त्यांची नावे मात्र मतदार यादीत असून त्यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावला जात आहे.

कोणाच्या आई वडीलांची नावे मतदार यादीतून गहाळ तर कोणाच्या मुलांची पत्नीचे नाव मतदार यादीत पण कुटुंबप्रमुखाचे नाव मतदार यादीत नाही असं चित्र कल्याण पूर्वेत पाहायला मिळाले. मतदान केंद्रांच्या अवतीभवती लागलेल्या बुथवर आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलीय.

Web Title: kalyan lok sabha election 2024 confusion persists in voter list in kalyan voter disenfranchised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.