ठाकरेंचा एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला? घेतली श्रीकांत शिंदेंची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:35 IST2026-01-18T13:35:32+5:302026-01-18T13:35:53+5:30

Kalyan Dombivli Municipal Corporation Election Result: महापौर आणि इतर पदांवरील आपला दावा पक्का करण्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगपालिकेमध्ये उद्धवसेनेकडून निवडून आलेल्या एका नगरसेवकाने रात्री श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Kalyan Dombivli Municipal Corporation Election Result: A Shiv Sena UBT corporator attacked Shinde? Met Shrikant Shinde | ठाकरेंचा एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला? घेतली श्रीकांत शिंदेंची भेट 

ठाकरेंचा एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला? घेतली श्रीकांत शिंदेंची भेट 

महानगरपालिका निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता महापौर आणि इतर पदांच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात मुंबईसह अनेक महानगपालिकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून सत्ता मिळवणाऱ्या भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये अधिकाधिक ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चढाओढ दिसून येत आहे. तसेच महापौर आणि इतर पदांवरील आपला दावा पक्का करण्यासाठी अपक्ष आणि इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगपालिकेमध्ये उद्धवसेनेकडून निवडून आलेल्या एका नगरसेवकाने रात्री श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईजवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून लढणाऱ्या शिंदेसेना आणि भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे. १२२ नगरसेवक असलेल्या कल्याण डोंबिवली महानगपालिकेमध्ये शिंदेसेनेचे ५४ नगरसेवक निवडून आले आहे आहेत. तर भाजपाने ५० जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये पदांच्या वाटपासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. याचदरम्यान, उद्धवसेनेकडून निवडून आलेले नगरसेवक मधूर म्हात्रे यांनी काल रात्री शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

मधूर म्हात्रे यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने उद्धवसेनेच प्रवेश करून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी भाजपाचे उमेदवार विक्की तरे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. या विजयानंतर मयूर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत निर्विवाद यश मिळवणाऱ्या भाजपा आणि शिंदेसेनेला आव्हान देत ठाकरे बंधूंच्या युतीने १६ जागांवर विजय मिळवला होता. त्यात उद्धवसेनेने ११ तर मनसेने ५ जागांवर विजय मिळवला.  

Web Title : ठाकरे के पार्षद शिंदे से मिले, KDMC चुनाव के बाद दल-बदल की अटकलें तेज़।

Web Summary : KDMC चुनाव में सफलता के बाद, शिवसेना (UBT) के पार्षद, मधुर म्हात्रे, श्रीकांत शिंदे से मिले, जिससे दल-बदल की अटकलें तेज़ हो गईं। म्हात्रे ने पहले शिंदे सेना का टिकट न मिलने पर भाजपा उम्मीदवार को हराया था। इस मुलाकात से सत्ता संघर्ष के बीच सवाल उठ रहे हैं।

Web Title : Thackeray corporator meets Shinde, fueling defection rumors after KDMC polls.

Web Summary : Following KDMC election success, a Shiv Sena (UBT) corporator, Madhur Mhatre, met Shrikant Shinde, sparking defection speculation. Mhatre previously defeated a BJP candidate after being denied a Shinde Sena ticket. This meeting raises questions amid power struggles.