देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने  उभे राहणार: आमदार विश्वनाथ भोईर

By मुरलीधर भवार | Published: May 20, 2024 09:30 AM2024-05-20T09:30:46+5:302024-05-20T09:31:51+5:30

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे माध्यमांशी बोलत होते. 

for the development of the country voters will stand with the mahayuti said mla vishwanath bhoir | देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने  उभे राहणार: आमदार विश्वनाथ भोईर

देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने  उभे राहणार: आमदार विश्वनाथ भोईर

मुरलीधर भवार, कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली असून देशाच्या विकासासाठी मतदार हे महायुतीच्याच बाजूने उभे राहतील असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड विकासकामे ही जनतेच्या डोळ्यासमोर आहेत. ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचे सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त करत देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहनही आमदार भोईर यांनी यावेळी केले. 

तर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे. तो अधिकार आपण सर्वांनी बजावावा आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले. 

यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली विश्वनाथ भोईर, भाऊ प्रभूनाथ भोईर, सुप्रिया प्रभूनाथ भोईर, वैभव विश्वनाथ भोईर आणि विशाखा रुपेश भोईर या सर्व कुटुंबीयांनीही आपले मतदानाचे कर्तव्य बजावले.

Web Title: for the development of the country voters will stand with the mahayuti said mla vishwanath bhoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.