भाजपचे पाच तर शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:13 IST2026-01-02T11:12:13+5:302026-01-02T11:13:03+5:30
यापूर्वी भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही गुरुवारी चौकार मारत खाते उघडले...

भाजपचे पाच तर शिंदेसेनेचे चार उमेदवार बिनविरोध
डोंबिवली : निवडणुकीत गुरुवारी भाजपच्या पाथर्लीमधून पॅनल २७ च्या उमेदवार मंदा पाटील व पॅनल २४ मधील उमेदवार ज्योती पवन पाटील बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांची संख्या पाच झाली.
यापूर्वी भाजपच्या रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्या. शिंदेसेनेनेही गुरुवारी चौकार मारत खाते उघडले. शिंदेसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांची बिनविरोध निवड झाली. पॅनेल क्र. २८ अ मधून शिंदेंचे आमदार राजेश मोरे यांचे पुत्र हर्षल मोरे यांचीही बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यांच्या विरोधातील दोन अपक्ष उमेदवारांनी गुरुवारी माघार घेतली.