जागावाटपापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेत ९ उमेदवारांना दिले एबी फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:55 IST2025-12-30T12:55:12+5:302025-12-30T12:55:39+5:30
भाजप आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

जागावाटपापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेत ९ उमेदवारांना दिले एबी फॉर्म
कल्याण : भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच भाजपने कल्याण पूर्वेतून नऊ उमेदवारांना एबी फॉर्म दिले. भाजप आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयातून या एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.
कल्याण पूर्वेतून भाजपतर्फे पॅनल क्रमांक १४-ब मधून हेमलता पावशे, पॅनल क्रमांक ११-ब मधून मनीषा गायकवाड, पॅनल क्रमांक १३-क मधून सरोज राय, पॅनल क्रमांक १३-ब मधून पूजा गायकवाड, पॅनल क्रमांक १६-ब मधून इंदिरा तरे, पॅनल क्रमांक १८-ब मधून स्नेहल मोरे, पॅनल क्रमांक १८ अ मधून रेखा चौधरी, पॅनल क्रमांक १६-क प्रणाली जोशी आणि पॅनल क्रमांक १३-ड मधून विक्रम तरे यांना एबी फॉर्म देण्यात आले.
नात्यागाेत्याचे राजकारण आणि उमेदवारी...
या नऊ उमेदवारांपैकी पावशे, गायकवाड, तरे, चौधरी आणि विक्रम तरे हे मागील महापालिकेत नगरसेवक होते. भाजपने माजी नगरसेवक मनोज राय यांची पत्नी सरोज यांना उमेदवारी दिली. मनाेज राय यांनीदेखील उमेदवारी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली.
विक्रम तरे यांनी उपमहापौरपद भूषविले आहे. मात्र, त्यांच्या पत्नी मोनिका यांना उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपकडून जवळपास ५३० जण महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. कल्याण पूर्वेतून भाजपच्या वाट्याला केवळ नऊ जागा आल्या आहेत.