जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट
By अनिकेत घमंडी | Updated: June 1, 2024 19:35 IST2024-06-01T19:35:05+5:302024-06-01T19:35:52+5:30
मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीबाबत केले समाधान व्यक्त

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट
डोंबिवली:कल्याण लोकसभा मतदार संघातील संपन्न झालेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी मंगळवारी रोजी वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात संपन्न होत आहे. या मतमोजणी प्रक्रियेसाठी सुरु असलेल्या कामकाजाची पाहणी करण्याकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास आज भेट दिली.
यावेळी त्यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते व इतर संबंधित अधिकारी वर्गाकडून मतमोजणीच्या कार्यपध्दतीचा आढावा घेतला आणि झालेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.
याचवेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मतमोजणी केंद्राची तसेच मिडीया कक्षाची देखील प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित अधिकारी वर्गाला योग्य ती कार्यवाही तात्काळ करणेबाबत निर्देश दिले.