केडीएमसीच्या मतदान जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ
By मुरलीधर भवार | Updated: May 7, 2024 18:37 IST2024-05-07T18:37:17+5:302024-05-07T18:37:37+5:30
कल्याण पूर्व परिसरातही महापालिकेचे शिक्षणाधिकारी अधिकारी विजय सरकटे यांच्यामार्फत मतदान जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे

केडीएमसीच्या मतदान जनजागृतीच्या प्रयत्नांना नागरिकांचीही साथ
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता महापालिका आपल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या अभिनव उपक्रमांचे आयोजन करीत आहे. महापालिकेचे स्वीप नोडल अधिकारी व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी देखील कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील नागरिकांना मोठया संख्येने मतदान करणेबाबत आवाहन केले आहे.
कल्याण पूर्व परिसरातही महापालिकेचे शिक्षणाधिकारी अधिकारी विजय सरकटे यांच्यामार्फत मतदान जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन कल्याण पूर्व परिसरातील कशिष इंटरनॅशनल हॉटेल येथे संपन्न झालेल्या वारकरी मेळावा हरिनाम संकिर्तन कार्यक्रमात वारकरी समाज आणि कल्याणकर जागरुक नागरिक समितीचे पदाधिकारी, सदस्य यांनी संयुक्तरित्या मतदान जनजागृती अभियान राबवित आजूबाजूच्या नागरिकांना २० मे रोजी मतदान करणेबाबत आवाहन केले. सदर आवाहनाला नागरिकांनी उत्साहात प्रतिसाद दिला.