लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

By मुरलीधर भवार | Published: April 15, 2024 06:40 PM2024-04-15T18:40:56+5:302024-04-15T18:41:41+5:30

सातपुते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सीझर कमिटीच्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते

all the systems should work in team spirit and coordination for the lok sabha elections 2024 appeal of sushma satpute | लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे; सुषमा सातपुते यांचे आवाहन

मुरलीधर भवार, कल्याण: लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सांघिक भावनेने आणि समन्वयाने काम करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी केले आहे.

आज सातपुते यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सीझर कमिटीच्या नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी त्यांनी उपरोक्त आवाहन करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता जाहीर झाल्यापासून एफआयटी टीमचे काम सुरू झाले आहे. या टीमने आक्षेपार्ह रोकड, लिकर ,भेटवस्तू आदी.सापडल्यास कशा प्रकारे कारवाई करावी याच्या सूचना उपस्थित समन्वय अधिकारी यांना देण्यात आल्या, त्याचप्रमाणे या कार्यवाहीसाठी आयकर विभाग, जीएसटी विभाग , राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग या सर्वांचे प्राधिकृत अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशाही सूचना सूचनाही सातपुते यांनी दिल्या आहेत.

या प्रसंगी पोलीस खात्याचे वरिष्ठ प्रतिनिधी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे समन्वय अधिकारी, कल्याण ग्रामीण मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, कल्याण लोकसभा मतदार संघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, खर्चाचे नोडल अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक खर्च निरीक्षक शरद देशमुख यांच्यासह सर्व विधानसभा मतदार संघाच्या आदर्श आचारसंहिता पथकांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते.

Web Title: all the systems should work in team spirit and coordination for the lok sabha elections 2024 appeal of sushma satpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.