Long rows at some polling stations in Jalgaon | जळगावात काही मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा

जळगावात काही मतदान केंद्रांवर लांबलचक रांगा

जळगाव- जळगावातील काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. तेवढीच गर्दी मतदान केंद्राबाहेर मतदार स्लीप घेण्यासाठी आहे. जळगाव येथील विद्या इंग्लिश स्कूलमध्ये मोठीच रांग पहायला मिळाली. 


 वावडदा ता. जळगाव येथे मतदान  केंद्र क्र.३०१ वर ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान उशिरा सुरु झाले. पिंप्राळा परिसरातील मनपा उर्दू शाळा क्र. ३५ वर मतदानासाठी गर्दी उडाली आहे. सकाळी दोन यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. ही यंत्रे लागलीच दुरुस्त करण्यात आली. 


दरम्यान, जळगावच्या जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Long rows at some polling stations in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.