जितेंद्र मराठे, हर्षदा सांगोरे यांच्यासह २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी; महानगराध्यक्षांनी केली पक्षशिस्तभंगाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 11:54 IST2026-01-09T11:54:05+5:302026-01-09T11:54:05+5:30
हकालपट्टी झालेल्यांमध्ये पाच माजी नगरसेवक

जितेंद्र मराठे, हर्षदा सांगोरे यांच्यासह २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी; महानगराध्यक्षांनी केली पक्षशिस्तभंगाची कारवाई
जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केल्यामुळे भाजपने माजी नगरसेवकांसह काही पदाधिकारी अशा एकूण २७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पक्षशिस्तभंग केली म्हणून या कार्यकर्त्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पक्षाच्या धोरणे, निर्णय व संघटनात्मक शिस्त न पाळता पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत असल्याचा ठपका ठेवला आहे. या संदर्भात झालेल्या पक्षाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो पक्षहित व संघटनात्मक शिस्त लक्षात घेऊन घेतल्याचे भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, गिरीष कैलास भोळे, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शातांराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, ज्योती विठ्ठल पाटील, मयूर श्रावण बारी, तृप्ती पाडुरंग पाटील, सुनिल ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
हकालपट्टी झालेल्यांमध्ये पाच माजी नगरसेवक
हकालपट्टी झालेल्या भाजप पदाधिका-यांमध्ये ५ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यात माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, हर्षदा अमोल सांगोरे, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, चेतना किशोर चौधरी यांचा समावेश आहे.