जळगावात मतदानापूर्वी गोंधळ! ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकला, उमेदवारांनी घेतला आक्षेप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:47 IST2026-01-15T08:47:09+5:302026-01-15T08:47:54+5:30
निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत मशीनचा क्रम बदलला...?

जळगावात मतदानापूर्वी गोंधळ! ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकला, उमेदवारांनी घेतला आक्षेप !
जळगाव - शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक १५ येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला आहे. ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली.
यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला. दरम्यान, मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. उमेदवार प्रतिनिधींची मागणी केल्यानंतर वातावरण शांत झाले.