अपक्ष उमेदवाराला घरात शिरून मारहाण; पोलिसांनी केला लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:19 IST2026-01-16T09:12:24+5:302026-01-16T09:19:17+5:30

योगेश्वर नगरातील घटना

An independent candidate in Jalgaon was assaulted after intruders broke into his house | अपक्ष उमेदवाराला घरात शिरून मारहाण; पोलिसांनी केला लाठीचार्ज

अपक्ष उमेदवाराला घरात शिरून मारहाण; पोलिसांनी केला लाठीचार्ज

जळगाव : पैसे वाटपाच्या संशयावरून प्रभाग क्रमांक तीनमधील अपक्ष उमेदवाराच्या घरात शिरून दमदाटी करीत मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी दुपारच्या सुमारास का.उ. कोल्हे विद्यालयाच्या मागील बाजूस योगेश्वर नगरात घडला. यावेळी शनिपेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तणावसदृश्य परिस्थिती असताना पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीचार्ज करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये सकाळपासून शांततेत मतदान सुरु होते. यावेळी जुन्या खेडी रोड परिसरात असलेल्या योगेश्वर नगरात अपक्ष उमेदवार हे मतदारांना पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरून प्रतिस्पर्धी उमेदवार हे समर्थकांसह योगेश्वर नगरात पोहचले. ते अपक्ष उमेदवाराच्या घरात शिरत त्यांना दमदाटी केली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांचे समर्थक समोरासमोर आल्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.

महायुतीच्या पदाधिकारी उद्धव सेनेच्या उमेदवारासाठी धावल्या..

उद्धव सेनेचे उमेदवार मयूर कापसे यांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबत गटाच्या पदाधिकारी प्रतिभा शिंदे यांनी कापसे यांच्या निवासस्थानी जाऊन बंदोबस्तासाठी लावण्यात आलेल्या पोलिसांना जाब विचारला, तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मात्र, महायुतीच्या पदाधिकारी उद्धव सेनेच्या उमेदवारासाठी धावून आल्याने राजकीय चर्चाना मोठ्या प्रमाणात स्थापण आले.

उमेदवाराच्या घरासमोर बंदोबस्त, गर्दी कमी होण्याऐवजी वाढली... 

प्रभाक क्रमांक ८ मधील उद्धव सेनेचे उमेदवार मयूर कापसे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याची तक्रार विरोधी उमेदवारांकडून प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानंतर मयूर कापसे यांच्या घरासमोर पोलिसांनी बंदोबस्त लावला. त्यावर उमेदवारांच्या नातेवाइकांनी आक्षेप घेत, पोलिस प्रशासनाकडून घरातील सदस्यांना नजरकैद करून घराबाहेर निघू दिले जात नसल्याचा आरोप केला. त्यामुळे या घरासमोर गर्दी कमी न होता अधिक वाढली, यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
 

Web Title : निर्दलीय उम्मीदवार पर हमला; पुलिस ने भीड़ को नियंत्रित करने के लिए लाठीचार्ज किया

Web Summary : जलगांव में एक निर्दलीय उम्मीदवार पर पैसे बांटने के संदेह में हमला किया गया। समर्थकों के बीच झड़प के बाद पुलिस ने तनावपूर्ण स्थिति को नियंत्रित करने के लिए हल्का लाठीचार्ज किया। एक अन्य उम्मीदवार के आवास के पास हाउस अरेस्ट और बढ़ती भीड़ के आरोपों ने तनाव बढ़ा दिया।

Web Title : Independent Candidate Assaulted; Police Use Lathi Charge to Control Crowd

Web Summary : An independent candidate in Jalgaon was assaulted over suspected money distribution. Police used mild lathi charge to control the tense situation after supporters clashed. Allegations of house arrest and increased crowds heightened tension near another candidate's residence.