Rally and Corner Meetings by Danve | दानवेंकडून रॅली आणि कॉर्नर बैठकांवर भर
दानवेंकडून रॅली आणि कॉर्नर बैठकांवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ रविवारी संभाजीनगर-श्रीकृष्ण विठ्ठल रुख्मिणी नगर-भोकरदन नाका-ढवळेश्वर-शिवाजी नगर-लक्कडकोट परिसरामध्ये रॅली काढण्यात आली. तर दानवे यांनी दिवसभर वेगवेगळ्या समाजबांधवांच्या बैठका घेतल्या.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख, शहराध्यक्ष सिद्धी मुळे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, नगरसेविका मीना घुगे, शांताबाई राठी, सुनील राठी, गणेश घुगे, महेंद्र अकोले, धनराज काबलिये, बाबासाहेब कोलते, रोषण चौधरी, सुभाष सले, राजू सलापुरे, कमल तुल्ले, जिजाबाई जाधव आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रूख्मिणी गार्डन येथे दुपारी दानवे यांच्या उपस्थितीत तेली समाजबांधवांची बैठक झाली. यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. अंबड तालुक्यात माजी आ. अ‍ॅड. विलास खरात यांनीही पदयात्रा, बैठका घेतल्या.


Web Title: Rally and Corner Meetings by Danve
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.