Meetings, rally for Raosaheb Danve's campaigning | दानवेंच्या प्रचारार्थ सभा, रॅली...
दानवेंच्या प्रचारार्थ सभा, रॅली...

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ जालन्यासह भोकरदन, जाफराबाद, राजूर, अंबड तालुक्यातील विविध गावांमध्ये कॉर्नर सभा, रॅली काढून प्रचार करण्यात आला. यावेळी भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
जालना शहरातून ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी नगरसेविका कमल तुल्ले यांच्या नेतृत्वाखाली कचेरी रोड, भाग्यनगर, इंदिरानगर इ. भागांमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. भोकरदन जाफराबाद तालुक्यातही वेगवेगळ्या गावामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रॅली काढून प्रचारात रंगत आणली. अंबड तालुक्यातील ताडहादगाव येथे माजी आ. विलास खरात यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी डॉ. नंदकिशोर पिंगळे, सुभाष देंडगे, शार्दूल खरात, योगेश देशमुख, सुरेश भावले, नाझिम सरकार, लोहिया, अशोक शिंदे, विष्णूपंत मांगले, गणेश शिंदे, गजानन शिंदे, गणेश रानमाळे, विष्णू शिंदे, संभाजी शिंदे, राहुल हरिश्चंद्र, परमेश्वर वाघुंडे, मुक्ताराम कावळे, ओमप्रकाश वाघुंडे, जयाजी हरिश्चंद्रे, हभप आत्मानंद स्वामी आदींची उपस्थिती होती. ताडहादगाव, बनगाव, देगावकर तांडा परिसरात हा प्रचार करण्यात आला.
राजूर परिसरातील गावामध्ये सुधाकर दानवे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर सभा घेण्यात येत आहे. राजूर परिसरातील बाणेगाव, खामखेडा, थिगळखेडा, पळसखेडा, चांधई एक्को, चांधई ठोंबरी, चांधई टेपली, पिंपळगाव बारव, पळसखेडा पिंपळे इ. गावांत सुधाकर दानवे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्नर बैठका घेऊन रावसाहेब दानवे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी संजय खोतकर, विष्णू पाचफुले, शिवाजी थोटे, बाबूराव खरात, रामेश्वर पडोळ, रामलाल चव्हाण, माधव हिवाळे, गजानन नागवे, रामेश्वर सोनवणे, अप्पासाहेब साखरे, ओंकारसिंह शेखावत, भाऊसाहेब भुजंग, मुसा सौदागर, शिवाजी पुंगळे, श्रीरामपंत पुंगळे, भगवान टेपले, विष्णू ठोंबरे, भगवान नागवे, विठ्ठल ठोंबरे, प्रल्हाद गाडेकर, ज्ञानेश्वर पुंगळे, राहुल दरक, राजू जगताप, गोरखनाथ कुमकर आदींची उपस्थिती होती.


Web Title: Meetings, rally for Raosaheb Danve's campaigning
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.