कळमनुरी निवडणूक निकाल: यावेळी जनतेने शिवसेनेचा 'संतोष' निवडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:21 IST2019-10-24T13:20:07+5:302019-10-24T13:21:32+5:30
Kalamnuri Central Vidhan Sabha Election Results 2019: Santosh Bangar vs Santosh Tarafe

कळमनुरी निवडणूक निकाल: यावेळी जनतेने शिवसेनेचा 'संतोष' निवडला
शिवसेनेचे संतोष बांगर यांनी 16हजार 123 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी कॉंग्रेसचे संतोष टारफे यांच्यावर विजय मिळवळा. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला महायुतीला ९६ हजार ३५ तर काँग्रेसला ५२,७२४ तर वंचितला ३८,४४२ मते होती. यामुळे विधानसभेत वंचित किती मते घेणार यावर शिवसेना आणि कॉंग्रेसच्या विजयाचे गणित अवलंबून होते. तसेच सेनेच्या संतोष बांगर यांनी माजी खा.शिवाजी माने व माजी आ.गजानन घुगे यांची मनधरणी करून आपली बाजू भक्कम करून घेतली. त्यामुळे मतदारसंघात सेनेसमोर मोठे आव्हान दिसले नाही.