जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 08:28 IST2024-11-20T08:28:07+5:302024-11-20T08:28:28+5:30

मालेगाव मार्गावरील गिरगाव फाट्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

Jansurajya Shakti Party candidate Padeshwar Maharajs car pelted with stones Maharaj injured | जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी

जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी

इस्माईल जहागिरदार, वसमत (जि. हिंगोली): विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराज यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गिरगाव मार्गावर दगडफेक करण्यात आली. यात महाराज जखमी झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजता पादेश्वर महाराज वसमतवरुन गिरगावकडे निघाले होते. मालेगाव मार्गावरील गिरगाव फाट्यावर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत गाडीचा काच फुटला व दगड महाराजांना लागला असून ते या घटनेत जखमी झाले आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि रामदास निरदोडे ,सपोनि अनिल काचमांडे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता, याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात झाला नव्हता. तक्रार आल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिस प्रशासनाने सांगितले.

Web Title: Jansurajya Shakti Party candidate Padeshwar Maharajs car pelted with stones Maharaj injured