Hingoli Azmi - Former Shiv Sena fighters | हिंगोली आजी-माजी शिवसैनिकांची लढत
हिंगोली आजी-माजी शिवसैनिकांची लढत

हिंगोली मतदारसंघात यावेळी तब्बल २८ उमेदवार रिंगणात आहेत. खरी लढत काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारांत असून, वंचित आघाडी, बसपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर या मतदारसंघातील विजयाचे गणित आहे.
>बाहेरचे पार्सल परत पाठवा
काँग्रेसचे उमेदवार आणि माजी शिवसैनिक सुभाष वानखेडे यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला. शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीच केले नाही. पाच वर्षे आरक्षण, शेतीमाल भाव अशा अनेक मुद्द्यांवर केवळ दिशाभूल करण्याचे काम झाले, तर शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून धुळ्याचे पार्सल हिंगोलीवर लादले. हे परजिल्ह्यातील पार्सल परत पाठवा, असे आवाहन वानखेडे यांनी केले.


>गद्दाराला धडा शिकवा
नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील शिवसेनेचे उमेदवार असून, त्यांनी आजवरच्या खासदारांवर शरसंधान साधले. यापूर्वीच्या लोकांनी एकही प्रकल्प आणला नाही. बेरोजगारी, शिक्षण, उद्योग आणि रेल्वेच्या प्रश्नांवर त्यांचा जोर होता, तर वानखेडे यांनी शिवसेनेशी गद्दारी केली. पक्ष बदलून कचरा करून घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानात हा कचरा साफ करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
>हेही उमेदवार रिंगणात
वंचित आघाडीचे मोहन राठोड, बसपाचे डॉ.दत्ता धनवे, आयूएमएलचे अल्ताफ अहमद, बीआरएसपीचे असदखान म.खान, पीआरपीचे उत्तम कांबळे, एएचपीचे उत्तम धाबे, बीएमपीच्या वर्षा देवसकर, एचबीपीचे सुभाष वानखेडे, बीएमपीचे सुभाष वानखेडे, अपक्ष अ.कदीर, त्रिशला कांबळे, गजानन भालेराव, जयवंता वानोळे, देवजी असोले, प्रकाश घुन्नर, म.अहेमद, अ‍ॅड.मारोतराव हुक्के, वसंत पाईकराव, सुनील इंगोले २आदी २८ उमेदवार रिंगणात आहेत.


Web Title:  Hingoli Azmi - Former Shiv Sena fighters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.